महिलेने गर्भपातास नकार दिला म्हणून….

नाशिक जिल्ह्यामधल्या सटाणा तालुक्यातल्या एक गावात गर्भपातास नकार देणा-या विवाहितेला, पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. रुपाली कुमावत असं या पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेचं नाव असून, ती सुमारे 55 टक्के भाजली आहे. तिच्यावर नाशिकमधल्या खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

मूल होऊ देण्यास पतीचा विरोध

रुपालीला मूल होऊ देण्यास तिचा पती विलास कुमावतचा विरोध होता. त्यानं तिला गर्भपात करायला सांगितलं होतं. मात्र वारंवार सांगूनही ती ऐकत नसल्यानं, विलासनं भावाचा मदतीनं तीला जबर मारहाण करत अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

शारीरिक आणि मानसिक छळ

पोलिसांनी विलास कुमावत, त्याचा भाऊ तसंच वडिलांवर शारीरिक आणि मानसिक छळ, तसंच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *