सिलिंडर स्फोटात सांताक्रुझला ४ ठार

सिलिंडर स्फोटात सांताक्रुझला ४ ठार

सांताक्रुझमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या सिलिंडर स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला; तीन जण जखमी झाले. जखमींवर व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सांताक्रुझच्या गोळीबार परिसरात असलेल्या मणिलाल चाळीच्या खोली क्रमांक ४मध्ये राहणारी सईलकुमारी दीक्षित (४०) ही महिला सकाळी सिलिंडर बदलत होती. त्या वेळी सिलिंडर नीट न लागल्याने त्यातून गॅसगळती होऊन अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यात यशवंत दीक्षित (१८), राजेंद्र दीक्षित (३०), कपिल दीक्षित (४०), राजदेव दीक्षित (५०) यांचा मृत्यू झाला. सईलकुमारी, मीरा उपाध्याय (४०) आणि शोभा राजेंद्र दीक्षित या जखमी झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *