बिग बींची प्रकृती उत्तम

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता उत्तम असल्याचे अभिनेता आमिर खान याने सांगितले आहेत. मंगळवारी बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईतील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जोधपूरला पोहोचली होती. ते सध्या जोधपूरमध्ये ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहेत. आमिर खानने बुधवारी त्याच्या वाढदिवसानिमित्त एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याने ही माहिती दिली. ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’मध्ये अमिताभ यांच्यासोबत आमिर खान, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख काम करत आहेत.

‘माझ्या डॉक्टरांची टीम लवकरच इथे पोहोचेल आणि मला ठणठणीत करेल. माझ्या प्रकृती आणि उपचारांबाबत मी तुम्हाला वेळोवेळी माहिती देत राहीन,’ असे अमिताभ यांनी मंगळवारी पहाटे ब्लॉगमधून सांगितले होते. त्यानंतर मुंबईहून चार्टर्ड विमानाने डॉक्टरांचे एक पथक तातडीने जोधपूरला रवाना झाले. त्यांनी अमिताभ यांची तपासणी करून उपचारही सुरू केले. मात्र, त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून रात्री उशिरापर्यंत तरी काहीही माहिती देण्यात आली नव्हती.

दरम्यान, अमितजींची प्रकृती स्थिर असून, चित्रपटातील वजनदार वेशभूषेमुळे त्यांना मान आणि पाठदुखीचा त्रास झाल्याचे जय बच्चन यांनी सांगितल्यानंतर सर्व उलटसुलट चर्चेला विराम मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *