पिकअप गाडीला अपघात; ३ ठार तर १४ जखमी

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर नजीक आडवळे येथे वऱ्हाडाची गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३ जण ठार तर १४ जखमी झाले असून अजून काही जण दरीत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सदर अपघातआज रात्री आठ वाजता झाल्याचे वृत्त आहे.

पिकअप गाडीतून सर्वजण साखरपुड्याला जात होते. आडवले गावाजवळील वळणावर गाडी दरीत कोसळली. गाडीत सुमारे ३० जण होते असे सांगण्यात येते. जखमींना पोलादपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जण पार्टेकोंड येथील रहिवासी आहेत. रात्रीची वेळ असल्याने दरीत शोध घेण्यास अडथळे येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *