‘ठाणे आयुक्तांबाबत मुलीचा जबाब नोंदवा’

‘ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आणि तिला मध्यरात्री मसाज करायला लावले’, या आरोपांच्या संदर्भात त्या मुलीचे पोक्सो कायद्यातील कलम २४अन्वये जबाब नोंदवावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी ठाणे पोलिसांना दिले.

सहाय्यक पोलिस आयुक्त (विशेष शाखा) पद्मजा चव्हाण यांनी ‘पोक्सो’ कायद्यातील तरतुदीप्रमाणे मुलीला हव्या त्या ठिकाणी आणि तिच्या सोयीस्कर वेळेला जबाब नोंदवून घ्यावा आणि त्याविषयीचा कृती अहवाल सादर करावा, असे निर्देश देत न्या. राजेंद्र सावंत व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने पुढची सुनावणी २ एप्रिलला ठेवली. आयुक्त जयस्वाल हे रात्री उशिरा आपल्याकडून मसाज करून घ्यायचे, असे सांगत असलेला पीडित मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा याविषयी स्पष्टीकरण देताना, तो व्हिडीओ उघडकीस आल्यानंतर मुलीचे कुटुंब लगेचच घर सोडून गेल्याने मुलीचा जबाब नोंदवता आला नसल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. मुलीच्या आरोपांविषयी साशंकता असल्याचेही सरकारी वकिलांनी नमूद केले. मात्र, ‘मुलीच्या आरोपांविषयी शंका असली तरी पोलिसांनी कायद्यातील तरतुदींप्रमाणेच तिचा जबाब नोंदवायला हवा होता’, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *