सनी लिओनी झाली जुळ्या मुलांची आई!

पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी जुळ्या मुलांची आई झाली आहे. मागील वर्षी एक मुलगीही तिने दत्तक घेतल्याने आता ती तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडणार आहे. पती डॅनिअल वेबरसह या तीनही मुलांसोबतचा फोटो तिनं इस्टाग्रामवर शेअर केला आहे. हे जुळे मुलगे सरोगसीमार्फत जन्मले असल्याची माहिती सनीने दिली आहे.

या दोन्ही मुलांची नावेही तिनं सांगितली आहेत. अशर सिंह वेबर आणि नोरा सिंह वेबर अशी या मुलांची नावे ठेवली आहेत. आता आमचं कुटुंब पूर्ण झाल्याचं सनीनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. लातूर येथून एका दोन वर्षांच्या मुलीला सनीने दत्तक घेतले होते, तिचं नाव निशा कौर वेबर ठेवले आहे.

सनी या पोस्टमध्ये लिहिते की, ‘देवाची इच्छा. २१ जून २०१७ ला आम्हाला कळलं की आमच्या कुटुंबात ३ मुलं असणार आहेत. आम्ही कुटुंब वाढवायचा विचार केला आणि इतक्या वर्षांनी आता आमचं कुटुंब पूर्ण झालं. आमचे मुलगे काही आठवड्यांपूर्वी जन्मले, पण आमच्या स्वप्नात आणि मनात खूप वर्षांपासून होते.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *