पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांनी कपात !

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांनी कपात !

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ही कपात लागू करण्यात आली आहे. या महिन्यातील करण्यात आलेली ही दुसरी कपात आहे.

दिल्लीत मूल्यवर्धित करात वाढ झाल्याने दिल्लीकरांना या कपातीचा फायदा होणार नाही. देशभरात जरी पेट्रोलच्या किंमतीत कपात झाली असली तरी दिल्लीत पेट्रोलच्या दरात २८ पैशांनी वाढ होणार आहे.

दिल्लीत मात्र वॅट करात वाढ झाल्याने तेथे पेट्रोल महाग राहणार. आजपासून दिल्लीत पेट्रोलचे दर ६६.९० रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर ४९.७२ रुपये प्रतिलिटर असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *