महिला पोलिसांना धमक्या

महिला पोलिसांना धमक्या

स्वयंघोषित अध्यात्मिक बुवा आसाराम बापू यांच्याविरोधातील बलात्काराच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांना धमकीचे पत्र आल्यानं खळबळ उडाली आहे. ‘संत आसाराम आश्रम’ अशा नावानं हे पत्र आले असून त्यात महिला पोलिसांना गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली आहे.

अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून या प्रकरणी तात्काळ चौकशी सुरू केली आहे. आसारामविरोधी बलात्कार प्रकरणाचा तपास सध्या पोलीस निरीक्षक दिव्या राविया यांच्याकडं आहे. राविया यांनी गेल्या वर्षी पोलीस अधीक्षक कानन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आसारामांवरील आरोपपत्र तयार केले होते. या दोघींच्याच नावानं दोन दिवसांपूर्वी हे धमकीपत्र आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *