आकाश अंबानीचं ठरलं! ‘ही’ होणार देशातील सर्वात श्रीमंत घराण्याची सून?

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यावर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हीरा व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्र्लोका हिच्यासोबत त्याचं वर्षअखेरीस लग्न होणार आहे. डिसेंबम महिन्यात दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. श्र्लोका ही रसेल मेहता यांची सर्वात छोटी मुलगी आहे.

मात्र, अंबानी आणि मेहता या दोन्ही कुटुंबियांकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, येत्या काही आठवड्यांमध्ये दोघांच्या साखरपुड्याची घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंबानी आणि मेहता कुटुंब एकमेकांना पहिल्यापासून ओळखतात. आकाश आणि श्र्लोका या दोघांचं शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र झालं आहे. रसेल मेहता हे रोसी ब्लू डायमंडचे प्रमुख आहेत.

आकाश आणि श्र्लोका यांच्या लग्नाबाबत माहिती घेण्यासाठी मीडियाकडून अंबानी कुटुंब आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या प्रवक्त्यांना इ-मेल पाठवण्यात आला पण त्यावर कोणतंही उत्तर आलेलं नाही. अंबानी कुटुंबाच्या जवळच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजूनपर्यंत आकाशच्या लग्नाची किंवा साखरपुड्याची तारीख निश्चीत झालेली नाही. मेहता यांच्या रोसी ब्लू डायमंड कंपनीलाही यासंबंधी मेल पाठवण्यात आला पण त्यांच्याकडूनही उत्तर आलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *