हार्बर रेल्वेची वाहतूक चार तासानंतर पूर्वपदावर

वडाळा आणि कॉटनग्रीन स्थानकादरम्यान असलेल्या शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर रेल्वेवरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ती आता चार तासानंतर पूर्वपदावर आली आहे. आज (गुरूवार) सकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली होती. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. दरम्यान, दुरूस्तीनंतर लोकल वाहतून पूर्वपदावर आली आहे. सुरूवातीला अंधेरी-वडाळा व वडाळा-पनवेल अशी अंशत: लोकल सेवा सुरू झाली होती. बेस्टनेही अतिरिक्त बस सोडून प्रवाशांची सोय केली.

सकाळी ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानंतर सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. तर, पनवेलहून येणाऱ्या लोकल कुर्ला स्थानकापर्यंत थांबवण्यात येत होत्या. कुर्ला ते पनवेल दरम्यानची वाहतूक सुरु आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये व त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी बेस्ट प्रशासनाने अतिरिक्त बसची सोय केली. बेस्टमुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *