नागालँडमध्ये मतदान केंद्रात बॉम्बस्फोट

नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, तिजित जिल्ह्यातील एका मतदान केंद्रात बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

विधानसभेच्या ५९ जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रियेला विलंब झाला. तर तिजित जिल्ह्यातील एका केंद्रावर अज्ञातांनी गावठी बॉम्बचा स्फोट घडवून आणला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर स्फोटामुळं मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला होता. केंद्रातील फर्निचरचेही नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *