देहू रोड येथे एका वृद्धाने आपल्याच अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीत मुलीने स्वतः याप्रकरणी देहूरोड पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना देहू रोड येथे घडली आहे. ५५ वर्षीय आजोबाने १३ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आहे. पीडित मुलगी ही मामाकडे राहण्यास असते, काल रविवारी सायंकाळच्या सुमारास घरात कोणीच नसताना आरोपीने जबरदस्ती करत १३ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आज सकाळी देहूरोड पोलिसात पीडित मुलीने स्वत: तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. अधिक तपास देहू रोड पोलिस करत आहेत.
