ध्वनिक्षेपकाची परवानगी १२ दिवस

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० अंतर्गत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सण तसेच उत्सवाकरिता वर्षभरातील निवडक १२ दिवसांना सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

नागपूर जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या निवडक दिवसांना ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यासंबंधी वेळेची सूट देण्यात येणार आहे. या निवडक सणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती, ईद-ए-मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ में महाराष्ट्र दिन, गणपती उत्सवामध्ये ४ दिवस (दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विर्सजन व अनंत चतुर्दशी), नवरात्री उत्सव (अष्टमी व नवमी), दिवाळी (लक्ष्मीपूजन), ख्रिसमस तसेच ३१ डिसेंबर या सणांचा समावेश असून या सणांना ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यासंबंधी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यत सूट देण्यात येईल. याशिवाय उर्वरित ३ दिवसांची सूट ही स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बैठकीत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *