शिक्षकाचा १३ विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचार!

अमळनेर तालुक्यात शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जगदीश पाटील (वय ४० ) याने तेरा विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी शिक्षक फरार असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोपी शिक्षक जगदीश पाटील विद्यार्थींनींसोब अश्लील चाळे करायचा. या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी आरोपी पाटील मुलींना दमदाटी करत असल्याचे समोर आले आहे. काही विद्यार्थींनींनी झालेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर अनेक पालकांनी पोलिसात धाव घेतली. सध्या आरोपी शिक्षक रजा टाकून फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मारवड पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला दक्षता समिती सदस्यांसमोर विद्यार्थीनींचा ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदवला जात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराड यांनी अमळनेरला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *