कोल्हापुरात अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर चटके आणि मारहाण

एका अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर चटके देऊन त्याला गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातल्या नागाळा पार्कामध्ये उघडकीला आली आहे.

अल्पवयीन मुलीवर गुन्हा

याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात बाल प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलीवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे निलंबित पोलीस उपाधीक्षकांची ही मुलगी आहे.

घरात डांबून शारीरिक छळ

या कुटंबानं जबरदस्तीनं एका मुलाला दत्तक म्हणून आणलं होतं. त्याला घरात डांबून ठेवून त्याचा शारीरिक छळ करण्यात आला. गेली सहा वर्षं हा प्रकार सुरू होता. शेजाऱ्यांनी हे प्रकरण उघडकीला आणल्यानंतर आता त्या अल्पवयीन पीडित मुलाची सुटका करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *