टूथब्रश बदला

पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात काही स्टार्स आघाडीवर आहेत. डायना पेंटी सध्या ‘नो प्लास्टिक पॉलिसी’चा प्रचार करत पर्यावरणस्नेही गोष्टी वापराव्यात असा आग्रह धरताना दिसतेय. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिनं चाहत्यांना तसा संदेश देणारा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. पर्यावरणाचं नुकसान करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करणं टाळा असं त्यात ती सांगतेय. याची सुरुवात प्लास्टिकच्या टूथब्रशऐवजी बायोडिग्रेडबल टूथब्रशची निवड करण्याचा सल्ला तिनं दिला. पृथ्वीला वाचवण्यासाठी आपण हे करायला हवं असा डायना सांगते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *