पत्रकार सुधीर शुक्ला यांना ट्रेनमध्ये मारहाण

‘इंडिया टीव्ही’ वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर आज सकाळी १५ ते २० गुंडांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना जबर मार लागला आहे. मीरा रोड येथे ट्रेनमध्ये ही घटना घडली.

अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात यासंदर्भातला गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे. टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. दरम्यान, मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशननेही या घटनेचा निषेध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *