अभिनेत्री मेघना नायडूला भाडेकरूनेच लुटले

‘कलियों का चमन’ फेम बॉलिवूड अभिनेत्री मेघना नायडूची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून मेघनानं याबद्दल सांगितलंय. तिच्या गोव्यातील घरातील भाडेकरू घरभाडं न देताच पसार झाल्याचं तिनं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मेघनाच्या गोव्यातील घराच्या केअरटेकरनं हे घर दोन जणांना भाड्यानं दिलं होतं. भाडेकरूंनी ते मुंबईचे रहिवासी असून न्यूझीलंडमध्ये काम करत असल्याची माहिती दिली होती. त्यांनी दिलेलं आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सही बनावट असल्याचं समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *