पालघर: लग्नातील अन्नातून १५० जणांना विषबाधा

जिल्ह्यातील सफाळे जवळील मकूनसार येथें लग्नात गेलेल्या जवळपास १५० हुन अधिक वऱ्हाडीना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

विवाह समारंभाप्रसंगी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, सर्व वऱ्हाडी मंडळींनी लग्नातील भोजनाच अस्वाद घेतला. दरम्यान, दुपारी घेतलेल्या भोजनातून ही विषबाधा झाल्याचे समजते. येथील काही जण पालघर मधील ग्रामीण रुग्णालयात, काही सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काही जनावर पालघरच्या ढवळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *