राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. परंतु या पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षीही पंतप्रधानांनी राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली नव्हती.
पूर्वोत्तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक आधीच ठरलेली आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ते सिक्कीमसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत.त्यामुळे आज राष्ट्रपती भवनातल्या इफ्तारला ते उपस्थित राहणार नाहीत.
राष्ट्रपती भवनातल्या या इफ्तार पार्टीला केंद्रातील अनेक मंत्री, खासदार आणि विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

