बेस्टच्या कामगार कपातीच्या निर्णयामुळे नाराज असलेले बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार होते. मात्र बेस्ट कर्मचा-या संप सुरु होण्याआधीच मागे घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
बेस्टचा संप तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. औद्योगिक न्यायालयात खासगी बसेस वापरण्याच्या निर्णयावर ५ मार्चला सुनावणी होणार आहे.
खाजगीकरण होणार म्हणून संप
‘बेस्ट खासगीकरणाच्या वाटेवर आहे. त्यामुळे कर्मचारी कपात होणार आहे. त्यामुळे आम्ही संप करणारच. बेस्टचे ३२ हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार, असे बेस्ट कर्माचारी संघटनेचे शशांक राव म्हणाले.
बेस्ट कामगारांना आवाहन
तर युनियनच्या पदाधिकऱ्यांना महा-व्यवस्थापकांनी आश्वासन दिलं आहे की खाजगीकरण होणार नाही. कामगारांची कपात होणार नाही. शिवसेना या संपात सहभागी होणार नाही. सर्व बेस्ट कामगारांना आवाहन संपात सहभागी होऊ नये, असे बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ म्हणाले.
