दुचाकीवरून जाताना बंदी घातलेल्या मांज्यामुळे गळा चिरून गंभीर जखमी

दुचाकीवरून जाताना बंदी घातलेल्या मांज्यामुळे गळा चिरून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा मनोहर मुजुमदार (रा. सिंहगड रोड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मुजुमदार बुधवारी दुचाकीवरून शनिवारवाड्याकडून शिवाजीनगरकडे जात होत्या. शिवाजी पुलावर त्यांच्या गळ्याला चिनी मांजा अडकल्याने त्यांचा गळा चिरला होता. नागरिकांनी त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. मात्र, रविवारी सकाळी मुजुमदार यांचा मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे म्हणाले, ‘शिवाजी पुलावर हा मांजा कसा आला. तो कोणामुळे आला याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *