उत्तराखंडची राजधानी देहरादूनमधील एका मुस्लिम कुटुंबाने दत्तक घेतलेल्या एका हिंदू मुलाचे लग्न हिंदू परंपरेनेच लावून देत त्यातून धर्मनिरपेक्षतेचे एक आदर्श उदाहरणच समोर ठेवले आहे. तो मुलगा १२ वर्षांचा असताना या मुस्लिम कुटुंबाने त्याला दत्तक घेतले होते.
त्या मुलाच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुस्लिम कुटुंबाने त्याला दत्तक घेतले. आपल्या लग्नादरम्यान बोलताना या कुटुंबाविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना तो मुलगा सांगत होता, “माझ्या या मुस्लिम कुटुंबीयांसोबत मी होळी, दिवाळीपासून सर्व हिंदू सण साजरे केलेत. या कुटुंबाने नेहमीच माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. मला आई-वडील नसल्याचं या कुटुंबाने कधी जाणवू दिलं नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी आधार दिला आहे, मग ते माझं लग्न असो किंवा इतर काहीही.”
