हॉटेलमध्ये परपुरूषासोबत पत्नीला रंगेहात पकडले.

गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये रविवारी एका पतिने हॉटेलमध्ये आपल्या पत्नीला परपुरुषासोबत रंगेहात पकडले. त्यानंतर त्याने पोलिसांना बोलावून त्या पुरुषासह पत्नीला पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दारुच्या नशेत असलेल्या आरोपी तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवरंगपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मितेशने( नाव बदलले आहे) रविवारी साधारण दोनच्या सुमारास शहर नियंत्रण कक्षाला फोन केला. त्याची पत्नी एका हॉटेलमध्ये एका परपुरूषासोबत असून या प्रकरणात त्याला पोलिसांची मदत हवी असल्याचे त्याने यावेळी सांगितले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक लगेचच हॉटेलच्या दिशेने पाठविण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आरोपी दारुच्या नशेत होता. दारूबंदी असतानाही नशेत असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस पतीने पत्नीवर केलेल्या आरोपांचीही पडताळणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *