सेक्स वर्कर्सला कंटाळून शाहिद कपूरवर घर सपत्नीक सोडण्याची वेळ

जुहू येथील आलिशान घरात वास्तव्यास असलेल्या अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे त्यांचे राहते घर सोडण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे. घरापासून काही अंतरावर चालणारा वेश्या व्यवसाय हे त्याच्या घर सोडण्याच्या विचारामागचे प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे.

सेक्स वर्कर्स आणि दलालांचा रस्त्यावर मुक्काम

शाहिद आणि मीरा हे जुहू येथील प्रणेता अपार्टमेंटमध्ये राहतात. हा परिसर तसा उच्चभ्रू समजला जातो. शाहिदही याच ठिकाणी राहतो. पण, या ठिकाणापासून काही अंतरावर असलेला परिसर हा प्रामुख्याने वेश्याव्यवसायासाठी ओळखला जातो. एका रिपोर्टनुसार या परिसरातील रस्त्यांवर अनेक वेश्या (सेक्स वर्कर्स) आणि दलाल उभे राहतात. घराकडे जाण्या-येण्यासाठी शाहिदलाही हाच रस्ता वापरावा लागतो. पण, रस्त्यावरील चित्र पाहून त्याला आपल्या कुटुंबासोब तेथे राहणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे त्याने घर सोडण्याचा विचार केला असल्याची चर्चा आहे.

शाहिद करणार नव्या घरात स्थलांतर?

प्राप्त माहितीनुसार, शाहिदने २०१४ मध्ये या अपार्टमेंटमध्ये घर घेतले आहे. पण, हे घर घेतले तेव्हा शाहीद बॅचलर होता. आता शाहिद विवाहीत आहे. असेही सांगितले जात आहे की, शाहिद आणि मीरा यांनी वांद्रे येथे नवे घर घेतले आहे आणि दोघेही नव्या घरात लवकरच स्थलांतरीत होणार आहेत.

‘पद्मावत’मध्ये दिसली छबी

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि अत्यंत वादग्रस्त ‘पद्मावत’ या ठरलेल्या सिनेमात शाहिदची छबी त्याच्या चाहत्यांना पहायला मिळाली. वादात अडकला असला तरी, या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *