गोरेगावमध्ये कापड कारखान्याला भीषण आग

गोरेगावमध्ये सकाळी भीषण आग लागली. गोरेगावमध्ये ओबेरॉय मॉलजवळच्या इटालियन इंडस्ट्री इस्टेटमध्ये एका कारखान्याला आग लागली.

हा कारखाना कापडाचा होता. त्यामुळे आग झपाट्यानं पसरली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे पाण्याची कमतरता असल्याने आगीवर नियंत्रण मिळवायला वेळ लागतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *