कुलभूषण जाधव यांच्याविरोधात दहशतवादी कारवाईचा आरोप

हेरगिराच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात असणारे भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याविरोधात आता दहशतवादी कारवाई आणि तोडफोड केल्याचे आरोप करण्यात आलेत.

कुलभूषण जाधव भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ साठी कार्यरत असल्याचा आरोप पाकिस्ताननं केलाय.  या प्रकरणात जाधव यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

याप्रकरणी भारताच्या १३ अधिकाऱ्यांकडे पाकिस्तानने भेटीची वेळ मागितली होती. मात्र भारताने काहीच सहकार्य केले नसल्याचा दावा पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राने केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *