विराटच्या फोटोवर राखी सावंतची ‘ही’ कमेंट

राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी राखी सावंत. आता राखी सावंतने भारतीय संघाचा कर्णधार आणि विरूष्काचा नवरा विराट कोहलीवर कमेंट केली आहे. विराटने शेअर केलेल्या फोटोवर राखीने कमेंट केली आहे. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात भारताने बाजी मारली. आहा हा संघ दोन एकदिवसीय सामने जिंकून संघ तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे. सध्या विराट त्याच्या सेनेसह केपटाउनला पोहोचला असून, तेथील एका लोकेशनचा विराटने त्याच्या चाहत्यांसाठी फोटो पोस्ट केला आहे.

विराटचा हा फोटो त्याच्या चाहत्यांकडून तुफान पसंत केला जात आहे. त्याचे चाहते विराटवर कॉमेण्टच्या माध्यमातून अक्षरश: शुभेच्छांचा पाऊस पाडत आहेत. दोन एकदिवसीय सामन्याच्या विजयाचे जणूकाही विराटच्या चाहत्यांकडून जल्लोषात सेलिब्रेशनच केले जात आहे. मात्र या आनंदाचा राखी सावंतने भंग करताना त्याच्या या फोटोला अशी काही कॉमेण्ट दिली ज्यामुळे त्याच्या चाहत्यांचा जबरदस्त संताप होत आहे.

राखी सावंतने च्या या कमेंटचा विराट आणि अनुष्काने देखील विचार केला नसेल. अशी कमेंट राखी सावंतने केली आहे. राखी सावंतने विराटच्या या फोटोखाली कमेंट करत म्हटलं आहे की, हाय बेबी माय स्वीटहार्ट, हनीमून होगया आणि यापुढे रडणारे इमोजी देखील लावले आहेत. या कमेंटमुळे राखीवर विरूष्काचे चाहते भडकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *