नागपुरात तलावात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

फुटाळा तलावात एकाच परिवारातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे.

आत्महत्या केलेल्यांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. नीलेश शिंदे, रुपाली शिंदे, आणि निहाली शिंदे अशी त्यांची नावे आहेत. हे कुटुंब नागपुरातील तेलांखाडी हनुमानमंदिर परिसरात रहात होतं.

रात्रीच्या वेळी त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अंबाझरी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या सर्वांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *