अज्ञातांनी कापले युवकाचे लिंग, तरूणीने दिला लग्नास नकार

मध्य प्रदेशातील मुरेन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. विवाह ठरलेल्या एका युवकाचे अज्ञातांनी लिंग कापल्याने एकच खळबळ उडाली आहे. युवक शौचास गेला असता त्याच्यासोबत ही घटना घडली. येत्या मंगळवारी युवकाचे लग्न होते. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे तरूणीने युवकाला लग्नास नकार दिला आहे. युवक अद्यापही धक्क्यातून सावरला नाही.

कापलेले लिंग घेऊन हल्लेखोरांचा पोबारा

प्राप्त माहितीनुसार, पीडित युवक कैलारास येथील राहणारा आहे. घटना घडली त्या दिवशी गुरूवारी तो शौचालयास बाहेर गेला असता दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्याचे लिंग कापले. घटना इतकी भयंकर आहे की, हल्लेखोर कापलेले लिंगही घेऊन पळाले. या आधी घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारा कापलेले लिंग पुन्हा यशस्वी रित्या जोडले आहे. पण, या घटनेच लिंगच नसल्याने ते पुन्हा जोडणे अशक्य बनले आहे.

 तरूणीने दिला लग्नास नकार

दरम्यान, युवकाचे ज्या तरूणीसोबत विवाह ठरला होता. त्या तरूणीने लग्नास नकार दिला आहे. तरूणीच्या कुटुंबियांनी दिलेली माहिती अशी की, आम्ही लग्नास तयार होतो. पण, आता आमचा विचार बदलला आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याचे कारणही आम्हाला समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *