‘घुमर डान्स ऑन आइस-पद्मावत

संजय लिला भन्साळीच्या ‘पद्मावत’ चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. त्यात ‘घुमर’ गाण्यातील दीपिका पादूकोणच्या नृत्याविष्कारानं प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. या हिट गाण्यावर मयुरी भंडारी हिनं आइस स्केटिंग डान्स केलंय. ते पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल!

‘पद्मावत’मधील घुमर हे गाणं सुपरहिट झालं आहे. या गाण्यावर मयुरी भंडारीनं ‘लय भारी’ नृत्य केलंय. त्याचा व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट केला आहे. ‘पद्मावतमधील घुमर या गाण्याला माझ्याकडून आइस स्केटिंगची खास भेट…मी राजस्थानची असल्यानं या गाण्यावर अभिमानानं स्केटिंग करत आहे’, असं तिनं म्हटलंय. यूट्यूबवर ‘घुमर डान्स ऑन आइस-पद्मावत’ या नावानं अपलोड केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *