विवाहितेला जाळल्याचा आरोप

भडगाव तालुक्यातील आंचळगाव येथे वीसवर्षीय विवाहिता ९५ टक्के जळाल्याची घटना बुधवारी (दि. ३१) सकाळी घडली. वैशाली अशोक पाटील असे विवाहितेचे नाव आहे. सासरच्या मंडळींनी तिचा छळ करीत रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला असून, जळीत महिलेवर जिल्हा सामान्य रूग्णालयातील जळीत विभागात उपचार सुरू आहे.

वैशाली यांचे दोन वर्षापूर्वी अशोक पाटील यांच्याशी लग्न झाले आहे. त्यांना नऊ महिन्याचा मुलगा आहे. तर माहेर पाचोरा तालुक्यातील वेरूळी येथील आहे. आई-वडीलांचा निधन झाल्याने वैशाली यांचे संगोपन आजोबा-आजींनी केले आहे. बुधवारी (दि. ३१) सकाळी अचानक वैशाली जळाल्याची घटना घडली. सासरच्या मंडळींनी पाचोरा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून तेथून निघून गेले. यानंतर माहेरच्या मंडळींना सकाळी ९ वाजता घटना कळताच त्यांनी पाचोरा येथून वैशाली यांना लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती वैशाली ह्या ९५ टक्के जळाल्याचे सांगितले. या वेळी वैशाली हिला सासरच्या मंडळींनी रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सासू आणि देराणी यांनी घरातच रॉकेट टाकून पेटवून दिल्याचे वैशाली हिने सांगितल्याचे आजोबा संतोष देवराम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *