२०० रुपयांची लाच घेणारा वाहतूक पोलीस निलंबित

  राज्याच्या उपराजधानीतला एक वाहतूक पोलीस हवालदार  चालान न करण्यासाठी, विदयार्थ्यांकडून २०० रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पोलीस तात्काळ निलंबित

भुंजगराव थाटे असं पैसे घेत असलेल्या या वाहतूक पोलीस हवालदाराचं नाव आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर वाहतूक शाखेनं थाटे यांना तात्काळ निलंबित केलं आहे.

चालनाचे पैसे बँकेत भरा

तसंच त्याच्या विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. याखेरीज चालनाचे पैसे बँक किंवा पोस्टात भरण्याचं आवाहनही नागपूर वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *