पृथ्वीराज चव्हाण – एकनाथ खडसे यांचा सोबत विमान प्रवास

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांची औरंगाबाद विमानतळावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

 औरंगाबाद विमानतळावर झाली भेट

खडसे दिल्लीला जात असताना औरंगाबाद विमानतळावर त्यांची चव्हाण आणि मोहन प्रकाश यांच्याशी अचानक भेट झाली. या तिघांनी सोबत कॉफीही घेतली. मात्र तिघांनी सोबत केवळ कॉफीच घेतली की बरंच काही झालं याबाबत मात्र चर्चा रंगलीय.

काँग्रेसच्या मंचावरून भाषण

खडसेंनी गेल्या आठवड्यात जळगावमध्ये काँग्रेसच्या मंचावरून केलेल्या भाषणात पक्ष सोडण्यास भाग पाडू नका असं सांगत मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान दिलं होतं. त्यामुळं त्यांची विमानतळावर झालेल्या काँग्रेस नेत्यांसोबतच्या चर्चेवरून आता अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *