सिगारेट पिता-पिता झोपला आणि जळून मेला!

सिगरेट ओढण्यामुळे कर्करोग होऊन मृत्यू होण्याच्या बातम्या नव्या नाहीत. मात्र, चेन्नईत जळत्या सिगरेटनं एका ७० वर्षांच्या वृद्धाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चेन्नईमध्ये राहणारे मणी नावाचे गृहस्थ शनिवारी आपल्या झोपडीत मद्यपान करत होते. सिगारेट पिण्याची लहर आल्यानं त्यांनी सिगरेट पेटवली. परंतु, दारूच्या नशेत त्यांना झोप लागली आणि अर्धवट जळलेली सिगरेट त्यांच्या हातून निसटली. या सिगरेटमुळे हळूहळू झोपडी पेट घेऊ लागली. झोपडीच्या खिडकीतून धूर येताना पाहून शेजाऱ्यांनी मणीच्या मुलाला श्रवणला बोलावून घेतले.

श्रवणनं अग्निशमनदलाला फोन करून बोलावले. परंतु, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्याआधीच त्याच्या वडिलांचा आगीत होरपळून मणीचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *