भिकाऱ्याकडे मिळाले चक्क 10 कोटी रुपये

भिकाऱ्याकडे मिळाले चक्क 10 कोटी रुपये

बॅंकेच्या खात्यात तब्बल 10 कोटी रुपये असलेल्या एका भिकाऱ्याला कुवेतच्या पोलिसांनी अटक केली आहे.

त्याच्याकडून जवळजवळ पाच लाख कुवेती दिनार म्हणजेच 10 कोटी रुपये मिळाले आहेत.

कुवेत शहरात एका मशिदीच्या समोर हा व्यक्ती भीक मागताना पकडला गेला आहे. भीक मागताना तो नेहमीच खोट्या आणाभाका घेत असे की मला पैशांची खूप गरज आहे शिवाय माझ्याकडे राहायला घरही नाही. अशी वेगवेगळी कहाणी सांगून तो लोकांकडून पैसे उकळायचा.

त्याला अल अहमदी पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यावेळी तपासात असे समोर आले की त्याने हा सगळा ऐवज एका स्थानिक बॅंकेत ठेवला होता. हा भिकारी कुवेतमध्ये राहणारा नसून बाहेरून आलेला आहे, असे कुवेत पोलिसांना चौकशीमध्ये पुढे आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *