सोन्याच्या दरात मोठी वाढ, यामुळे वाढले भाव!

सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याच सोनं खरेदी करणे तुम्हाला महागात पडणार आहे.

किती झाले दर

सोने दर सुमारे एक हजार रुपये प्रति तोळा वाढला आहे. मागील महिन्यात २४ कॅरेट सोने २९ हजार ७०० दर प्रति तोळा होता, आता प्रति तोळा दर ३० हजार सातशे झाला. सोन्याचा दर एका महिन्यात एक हजार रूपये वाढला.

म्हणून वाढले भाव

आंतराराष्ट्रीय मार्केटमध्ये मागणी आणि दर वाढल्याने राज्यांत सोने भाव वाढला आहे. लग्न विवाह सोहळ्याच्या  दिवसात सोने भाव वाढला आहे. देशात मागील वर्षात ७२५ टन सोने आयात केले होते, यंदा यांत वाढ होत देशात ८४६ टन सोने परदेशातून आयात केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *