अश्लील मेसेज पाठवणा-या रोड रोमियोला महिलेकडून चोप

नालासोपा-यात मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठवून महिलेला त्रास देण्या-या एका इसमाला संतप्त महिलांनी चांगलाच चोप दिला.

अश्लील मॅसेज पाठवून त्रास

पिंटू सिंग प्रीतम असं आरोपीचं नाव असून तो मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. पिंटू एका विवाहित महिलेला व्हॉट्सअॅपवर अश्लील मॅसेज पाठवून नाहक त्रास द्यायचा. गेल्या आठ दिवसांपासून पिंटू सिंग पीडित महिलेला व्हॉट्सअॅपवर मॅसेज, व्हॉईस मॅसेज, अश्लील गाणी आणि फोटो टाकून हैराण करत होता.

त्रास वाढल्यावर महिलेचा दणका

महिलेनं सुरूवातीला दुर्लक्ष केलं मात्र विकृत पिंटूचा त्रास वाढू लागल्यानंतर महिलेनं धाडस दाखवत त्याला चांगलाच धडा शिकवला. त्याला तुलीज पोलिसांच्या ताब्यात दिलं. सध्या आरोपी पिंटूची रवानगी तुरुंगात रवाणगी करण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *