तासगावात १९ वर्षीय विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रणाली प्रकाश पाटील असे तरुणीचे नाव असून ती मुळची वाळवा तालुक्यातील साखराळे गावची आहे.

प्रणाली शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये ड्रेस डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. आज (रविवारी) सकाळी रुममध्ये कोणी नसल्याचे पाहून तिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रणालीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनी आणि प्रणालीच्या रुममेट्स, शिक्षिकांकडे चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *