पूना गेस्ट हाऊसचे मालक सरपोतदार यांचं निधन

पूना गेस्टहाऊसचे मालक आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेले चारुदत्त सरपोतदार यांचं पुण्यात निधन झालं आहे. चारुकाका सरपोतदार या नावाने ते सुपरिचित होते. अल्प आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते.

हिंदू महासभेचं अध्यक्षपदही भूषवलं 

हिंदू महासभेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. तसंच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. पुणे खाद्यपेय विक्रेता संघाचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्यावर उद्या सकाळी दहा वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशामभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *