ठाण्यातील हरिनिवास सर्कल येथील गिरीराज हाईट्स इमारतीला आग

ठाणे – येथील हरिनिवास सर्कल जवळील गिरीराज हाईट्स या इमारतीच्या २६ व्या मजल्यावर दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या इमारतीच्या २५ व्या मजल्यावर कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांचे घर आहे. तर या इमारतीत अनेक प्रतितयश व्यक्तींचे वास्तव्य आहे. ज्या ठिकाणी ही आग लागली आहे, त्या ठिकाणी काही लोक अडल्याची भिती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे आणि बचावाचे कार्य सुरु झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *