सॅनिटरी पॅडसवरील जीएसटी रद्द करा- राष्ट्रवादीची मागणी

आज दिल्लीत होणाऱ्या GST कौन्सिल बैठकीच्या पार्श्वभूमीवर सॅनिटरी पॅडसवरील जीएसटी रद्द करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरातील जीएसटी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

मुंबईत माझगाव येथील जीएसटी भवनासमोर राष्ट्रवादीच्या नेतृ खासदार सुप्रिया सुळे यांच्यात्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

 
राष्ट्रवादी महिला काँग्रेसने येरवड्यात जीएसटी ऑफीसबाहेर आंदोलन केलं. सॅनिटरी पॅड्सवर जीएसटी परिषदेने 12 टक्के कर लावला आहे. स्त्रियांच्या स्वच्छता आणि सोयीसाठी महत्त्वाच्या असलेल्या सॅनिटरी पॅड्सवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *