ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या सायडिंगला जाणाऱ्या लोकलला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात २०१०-बी हा डबा जळून खाक झाला आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळं लागली हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याची माहिती आहे. आग लागली तेव्हा लोकलमध्ये कुणीही नव्हतं. त्यामुळं जीवितहानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले.
