वडिलांच्या मृत्यूप्रकरणी आमचा कुणावरही संशय नाही- अनुज लोया

दिवंगत न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणी अनुज लोया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

 

सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातल्या विशेष सीबीआय कोर्टाचे दिवंगत न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणी आपल्याला कोणताही संशय नाही असा खुलासा न्यायमुर्ती लोया यांचे पुत्र अनुज लोया यांनी केला.

भाजप अध्यक्ष अमित शाह आरोपी असलेल्या या खटल्याची सुनावणी न्यायमुर्ती लोया यांच्यासमोर सुरु होती. दरम्यान न्यायमूर्ती लोया यांचा डिसेंबर २०१४ मध्ये नागपुरात हृदयविकारानं मृत्यू झाला होता.

त्यावेळी लोया यांच्या मृत्यू प्रकरणी कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला होता. मात्र, याबाबत आता आपल्याला कोणताही संशय नसल्याचा खुलासा लोया यांच्या मुलानं केला आहे.

तर, न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणात आता कोणताच वाद नसून, या प्रश्नाचं राजकीय भांडवल करण्याची गरज नसल्याचं लोया यांचे वकील अमित नायक यांनी केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *