ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी, अवघ्या ६ तासांत बाळ चोरीला

ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाचा भोंगळ कारभार आपण नेहमीच पाहतो. यात आता आणखी भर घातलीय ती बाळ चोरीच्या प्रकरणानं…

 

अवघ्या ६ तासांचं बाळ पहाटेच्या सुमारास सिव्हील रुग्णालयातून चोरीला गेलंय. विशेष म्हणजे एक महिला चोरी करून मुख्य प्रवेश द्वारातून जाताना चक्क सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

त्यामुळे या सिव्हील रुग्णालयाची सुरक्षा कशी बेभरावशाची आहे हेच सिद्ध होतंय. याआधी याच जिल्हा रुग्णालयात अनेक चोरी आणि हाणामारीचे प्रकार उघडकीस आलेत. एवढं कमी होतं की, काय यात आता बाळ चोरीच्या प्रकारानं भर घातलीय.

भिवंडीमधील मोहिनी भोवर या महिलेचं ६ तासांचं बाळ चोरीला गेलयं. सिव्हील रुग्णालयाच्या मुख्य प्रवेश द्वारातून महिला बाळ घेऊन जात असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

सिव्हील रुगणालायत सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचेच या घटनेतून पुन्हा समोर आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *