कल्याणात हॉटेलमध्ये तरुणीवर गोळीबार

कल्याण येथील एका हॉटेलमध्ये तरुणीवर गोळीबार करण्यात आल्याने एकच धावपळ उडाली. या गोळीबारात तरुणी गंभीर जखमी झाली.

कोनगाव येथील केनपार्क हॉटेलमध्ये तरुणीवर गोळीबार करण्यात आला. दोन अज्ञात व्यक्ती बाईकवरून आलेत. त्यांनी थेट गोळीबार केला. तरुणीवर दोन ते तीन गोळ्या झाडल्या.

यातील एक गोळी तरुणीच्या पायाला लागली. यात ती जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपासासाठी ठाणे क्राईम ब्रांच आणि स्थानिक गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *