माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या कारला एस्कॉर्ट गाडीची धडक

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या कारला एस्कॉर्ट गाडीची धडक

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या कारला रविवारी एका एस्कॉर्ट गाडीने धडक दिली. चेन्नईमधील गिंडी भागामध्ये हा अपघात झाला. या अपघातात चिदंबरम यांच्या कारचे थोडेफार नुकसान झाले मात्र सुदैवाने चिदंबरम यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, एस्कॉर्ट गाडीला त्याच्या मागे असणाऱ्या एका गाडीने जोरदार धडक दिली. त्यामुळे ही कार पुढे असणाऱ्या चिदंबरम यांच्या कारला जाऊन धडकली. या अपघातात एस्कॉर्ट कारमधील चौघेजण जखमी झाले आहेत.

अपघाताच्या वेळी 69 वर्षीय चिदंबरम हे विमानतळाच्या दिशेने जात होते. या अपघातात एस्कॉर्ट कारचे बरचं नुकसान झालं आहे. तर चिदंबरम यांच्या देखील कारचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एस्कॉर्ट गाडीतील काहीजणांनी मद्यपान केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *