१० कोटींची फसवणूक, एकाला अटक तर तिघे ताब्यात

बॉश कंपनीची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एकाला अटक केली असून तिघांना ताब्यात घेतलंय.

१० कोटी ६६ लाख रुपयांना फसवलं

या रॅकेटने बॉश कंपनीला तब्बल १० कोटी ६६ लाख रुपयांना फसवलंय. बॉश कंपनीत गाड्यांचे सुटे भाग तयार होता. हे रॅकेटमधले आरोपी कंपनीतून सुटे भाग चोरत आणि भंगारमधली स्पेअर पार्ट्स कंपनीच्या नावे विकत असत.

 टोळीचा पोलिसांनी छडा लावला

कंपनीला गंडा घालणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला असून अंब़ड पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहेत. तर तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *