जगातील सर्वाधिक केस असलेल्या मुलीने केले शेव्ह, शेअऱ केला फोटो

जगातील सर्वाधिक केस असलेल्या मुलीने शेव्ह केल्यानंतरचा फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून सारेच हैराण झालेत. या मुलीचे नाव सुपात्रा सासुफैन असे आहे.

सुपात्राचे नाव २०१०मध्ये गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले होते. सुपात्रा अँब्रॉस सिंड्रोम आणि वेअरवुल्फ सिंड्रोम नावाच्या आजाराने पीडित आहे.

या आजाराने ग्रस्त लोकांना चेहरा, हात,पाय, पाठ आणि कानावर केस उगवतात. जगात अशा ५० घटना समोर आल्यात. लहानपणी लेदर ट्रीटमेंट केल्यानंतरही सुपात्राच्या अंगावरील केस वाढतच चालले होते.

आता सुपात्राने सोशल मीडियावर विना केसांचा फोटो शेअऱ करत सर्वांनाच हैराण केलेय. तिच्या नव्या लूकमुळे सर्वच आश्चर्यचकित झालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *