‘आयआरबी’चे संस्थापक दत्तात्रय म्हैसकर यांचे निधन

रस्ते बांधणी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘आयडियल रोड वेज’चे संस्थापक आणि प्रसिध्द उद्योजक दत्तात्रय पी. म्हैसकर यांचे बुधवारी संध्याकाळी राहत्या घरी अल्पश: आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुधाताई, मुलगा ‘आयआरबी’  इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र, ‘एमईपी’ इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक जयेंद्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पुणे येथून अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियंता (सिव्हील) पदाची पदवी घेतल्यानंतर दत्तात्रय म्हैसकर यांनी सुरूवातीच्या काळात खासगी बांधकाम कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मुंबई महापालिकेत बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरी केली. नावीन्यपूर्ण करण्याचा करण्याची वृत्ती असल्याने दत्तात्रय म्हैसकर यांचे नोकरीत मन रमले नाही. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ‘आयडीयल रोड वेज’ बांधकाम कंपनीची स्थापना केली. सुरूवातीच्या काळात त्यांनी मुंबई पालिकेत रस्ते ठेकेदार म्हणून काम सुरू केले. केलेले काम दर्जेदार, चोख असले पाहिजे, याकडे त्यांचा पहिल्यापासून कटाक्ष होता. त्यामुळे रस्ते कामातील एक अग्रगण्य ठेकेदार म्हणून ते अल्पावधीत लोकप्रिय झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *